प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९ वी धमाकेदार नाट्यकृती ‘माझ्या बायकोचा नवरा’ ही आता लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली असून या नाटकाचा शुभरंभाचा प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबरला आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण येथे होणार आहे.
या धमाल विनोदी नाटकाची निर्मिति श्रीमती कविता मच्छिन्द्र कांबळी, दिनू पेडणेकर, अभिजित देशपांडे, राहुल कर्णिक यांनी केली आहे.या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन सागर देशमुख यांनी केले असून सागर देशमुख, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
“माझ्या बायकोचा नवरा” हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच पण, नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे.